लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख विजयी

लातूर :पोलिसनामा ऑनलाईन – लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली. याठिकाणी काँग्रेसच्या धीरज देशमुख यांनी शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला. धीरज देशमुख यांना 63920 इतकी मते मिळाली तर शिवसेनेच्या सचिन देशमुख यांना 5978 इतकी मते मिळाली. धीरज देशमुख यांनी सचिन देशमुख यांचा एकतर्फी पराभव करत 58000 मतांनी विजय मिळवला आहे.

या मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट लढत झाली होती. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या काट्याच्या लढतीत अखेर धीरज यांनी विजय मिळवला.

Visit : Policenama.com