कौतुकास्पद ! साखरपुड्याचा खर्च वाचवून ‘त्याने’ केली पुग्रस्तांना मदत

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच कोल्हापूर सांगली भागात येऊन गेलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले आहेत. आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायला पुरग्रस्तांच्या मदतीला अनेक हात समोर येत आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने शक्य ती मदत पूरग्रस्तांना देण्यासाठी समोर येत आहे.

जेहुर आडगाव येथील रहिवासी धीरज चव्हाण हे मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी पदी आहेत. प्रशासकीय सेवेत नुकत्याच रुजू झालेल्या या अधिकाऱ्याने आपल्या साखरपुड्याचा खर्च वाचवून आणि मित्र परिवारातून जमलेल्या एकूण रकमेतून १०३ पूरग्रस्त कुटुंबीयांना मदत केली आहे. स्वतःच्या साखरपुड्यातून १० हजार आणि मित्रांकडून ३० हजार रुपये जमा करून हरिपूर येथील १०३ पूरबाधित कुटुंबांना भांडी वाटप केली.

आम्ही पूरग्रस्तांना केलेली मदत अल्प होती. त्यांना संसार पुन्हा उभारण्यासाठी आणखी मदतीची गरज आहे. परंतु, आम्ही दिलेल्या मदतीमुळे पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर समाधान होते. तसेच आम्हाला देखील मदत केल्याचा आनंद झाल्याचे धीरज चव्हाण यांनी सांगितले. हरिपूर गावातील १५० कुटूंबियांची घरे पुरामुळे उद्धवस्थ झाली आहेत.

आरोग्यविषयक वृत्त