विलासराव देशमुख यांचे सुपूत्र धीरज यांनी दिलं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘उदयनराजे हे राजे आहेत’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शुक्रवारी संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृती महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात राज्यातील तरुण आमदारांसोबत सुसंवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील आणि झिशान सिद्दिकी या युवा चेहऱ्यांना सहभागी करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुलाखतकार म्हणून अवधूत गुप्ते होते. यामध्ये अवधूत गुप्ते यांनी काँग्रेसचे युवा नेते धीरज देशमुख यांना कार्यक्रमाच्या रॅपिड फायर प्रश्नोत्तरात प्रश्न केला की सर्वात जास्त प्रेम हे अमित देशमुख वर की रितेश देशमुख वर आहे. तेव्हा धीरज देशमुख यांनी रितेश देशमुखचे नाव घेतले.

तसेच धीरज देशमुख यांना रॅपिड फायर प्रश्नोत्तरात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आदित्य ठाकरे वा रोहित पवार या दोघांपैकी कोणाला बघायला आवडेल, असा प्रश्न विचारल्यानंतर हे महाराष्ट्राने ठरवायचं आहे असं उत्तर त्यांनी दिले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी साताऱ्याचे भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांच्यात वाद चालू आहे. त्या अनुषंगाने संजय राऊत आणि उदयनराजे या दोघांपैकी नेमका कोणी धीर धरावा असा प्रश्न देखील अवधूत गुप्ते यांनी धीरज देशमुख यांना केला. यावर धीरज देशमुख यांनी उदयनराजे हे राजे असून ते श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे बाकीच्यांनी धीर धरावा असा अप्रत्यक्ष टोला धीरज देशमुखांनी संजय राऊतांना लगावला.

दरम्यान पुणे येथील लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांनी उदयनराजेंचा समाचार घेतला होता. ते म्हणाले होते की, देशात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना बोलू, तसेच उदयनराजे हे माजी खासदार आहेत आणि भाजपाचे नेतेही आहेत त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा आदर असून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जेव्हा येते तेव्हा आम्ही नतमस्तक होतो. तसेच महापुरुषांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वंशजांना विचारण्याची पद्धत नाही आहे. तसेच एवढ्यावर न थांबता ते म्हणाले की, उदयनराजे हे जर छत्रपतींचे वंशज असतील तर त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे असे आव्हान उदयनराजेंना केले होते. संजय राऊत आणि उदयनराजे यांचा वाद ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून निर्माण झाला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/