Dhirendra Krishna Shastri | संत तुकाराम महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर देहू संस्थान विश्वस्तांची नरमाईची भूमिका?; म्हणाले…

देहू : पोलीसनामा ऑनलाईन – धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी संत तुकाराम महाराजांबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांच्या त्या वक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच देहू संस्थानने याबाबत सहिष्णु भूमिका घेतली आहे. (Bageshwar Dham)

 

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना, ‘संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारायची त्यामुळेच ते देवाची भक्ती करू शकले.’ असे वक्तव्य केले होते. त्यावर भाजप आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी बागेश्वर महाराजांनी माफी मागावी. त्यांनी संत तुकाराम महाराजांचाच नव्हे तर महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी. अशी मागणी केली होती. (Dhirendra Krishna Shastri)

 

दरम्यान, देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे (Manik Maharaj More) यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना माफी दिली आहे. यावर बोलताना माणिक महाराज मोरे म्हणाले की, ‘संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी आमच्या मातोश्री आहेत. ज्यांनी तुकोबारायांना घास घातल्याशिवाय अन्नाचा कण घेतला नाही. तुकाराम महाराजांसाठी (Sant Tukaram Maharaj) ज्यांनी आयुष्यभर त्यागाची भूमिका घेतली, त्यांच्याबद्दल असे विधान चुकीचे आहे. त्यांच्या बाबतीत ऐकीव माहितीवर चुकीचे वक्तव्य करू नये. वारकरी संप्रदाय सहिष्णु आहे. आम्हीही त्यांना माफ करतो.’ असे यावेळी बोलताना देहू संस्थानाचे विश्वस्त माणिक महाराज मोरे म्हणाले.

नक्की काय म्हणाले होते बागेश्वर महाराज?
‘संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची.
याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली.
मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो.
मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे,
त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते.’
असे वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले होते.

 

Web Title :- Dhirendra Krishna Shastri | bageshwar dham dheerendra shashtri sarkar on sant tukaram maharaj dehu sansthan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahesh Landge | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून आमदार महेश लांडगेंची सर्वपक्षीयांना भावनिक साद; म्हणाले…

Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…

Amar Mulchandani ED Raid | कट रचून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमर मूलचंदानी याच्यासह 6 जणांविरुद्ध ईडीकडून स्वतंत्र FIR