अरे बापरे ! नीता अंबानी चक्‍क फोन कट करायच्या धीरूभाई अंबानींचा, पुढं झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील सगळ्यात श्रीमंत अंबानी परिवाराचा नेहमी कोणता प्रोग्रॅम असेल तेव्हा लोकांची नजर त्यांच्यावर टिकून असते. अंबानी परिवाराला देशात सगळ्यात संपन्न परिवार बनविणारे धीरूभाई अंबानींची आज पुण्यतिथी आहे. ६ जुलै २००२ ला धीरूभाई यांनी अखेरचा श्वास घेतला होता. एक अशी वेळ आली होती, जेव्हा धीरुभाई यांनी मोठी सून नीता अंबानी ओळखण्यास नकार दिला दिला होता.

मुकेश आणि नीता यांचे लग्न १९८५ मध्ये झाले होते. याआधी दोघांनी एकमेकांना २ वर्षे डेट केले होते. मुकेश यांच्या धीरुभाई अंबानी यांनी नीताला पसंत केले होते. नीता एक भरतनाट्यम डान्सर होती. धीरूभाई अंबानी यांनी एका फक्शनमध्ये नीताला डान्स करताना पाहिले होते. त्याचवेळी त्यांनी आपल्या मुलासाठी नीताला पसंत केले होते. याबाबतीत त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

नीताने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘गुजराती कम्युनिटीतर्फे नवरात्री मध्ये फंक्शन होता. मी त्या फंक्शनमध्ये परफॉर्म केले होते. मला काहीच अंदाज नव्हता की कोणीतरी मला नोटीस करत आहे. या नंतर मला घरी फोन आला. ते म्हणाले की, मी धीरूभाई अंबानी बोलत आहे. ‘

मला वाटले कोणीतरी चेष्टा करत आहे. मी लगेच फोन कट केला. यांनतर पुन्हा फोन आला. पुन्हा ते तेच बोलले. मी म्हणाले, हो मी एलिजाबेथ टायलर आहे आणि फोन ठेवून दिला. पुन्हा तिसऱ्यांदा फोन आला. त्यावेळी मी माझ्या वडिलांकडे फोन दिला. अचानक वडिलांचे हावभाव बददले. ते मला म्हणाले की, खरच.. धीरूभाई अंबानी आहे. आता तु त्यांच्याशी नीट बोलशील.

नीता म्हणाल्या, ‘त्यांनी मला ऑफीसला बोलवले होते. मी त्यांना भेटण्याआधी खूप नर्वस होते. त्यांना भेटल्यानंतर मी खूप प्रभावित झाले. मला ते खूप सरळ स्वभावाचे वाटले. त्यांनी मला त्यांच्या घरी डिनरला बोलवले. यांनतर माझा परिवार आणि मी त्यांच्या घरी डिनरला गेलो.’

तेव्हा धीरूभाई अंबानी यांनी आपला मुलगा मुकेश यांना म्हणाले की, मी तुझ्यासाठी एक मुलगी पसंत केली आहे. आज तुला तिला भेटवायचे आहे तु जाऊन दरवाजा खोल. तेव्हा मुकेश यांनी दरवाजा खोलला आणि नीताला पाहून ते तिच्या प्रेमात पडले. यानंतर त्यांनी एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नीता पहिली मुलगी होती जिला मुकेश डेट करत होते. नीताने सांगितले की, मुकेश मला रोज गुलाबाचे फुल देत होते. दोघेही मुंबईच्या गल्लीमध्ये स्ट्रीट फूड खात होते. एक दिवस मुकेशने नीताला आपल्या कारमध्ये प्रपोज केला.

गाडी थांबवून त्यावेळी मुकेशने नीताला विचारले की, तु माझ्याशी लग्न करशील का जोपर्यंत मला तु उत्तर देत नाहीस तोपर्यंत मी गाडी पुढे घेणार नाही. गाडी रस्त्यामध्ये थांबवून मुकेश नीताला विचारु लागले. मुकेश यांच्या मागच्या सगळ्या गाड्या हॉर्न वाजवू लागल्या पण ते नीताच्या उत्तराची वाट पाहत होते. नीताने काही वेळानंतर मुकेशला होकार दिला आणि गाडी पुढे गेली.

आरोग्यविषयक वृत्त

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

सिने जगत

PHOTOS : अभिनेत्री आलिया भट्ट ‘मूड’मध्ये असतानाचे फोटो व्हायरल, पाहून व्हाल थक्‍क

Video : ‘बाथटब’मधील व्हिडीओनंतर ‘त्या’ फोटोंमुळे मंदाना करीमीने तापवले सोशलचं ‘वातावरण’ !

Video : TV अभिनेत्री श्‍वेता तिवारीची मुलगी पलकच्या ‘ग्लॅमर’ आणि ‘बोल्ड’नेस पुढं बॉलिवूडमधील तारका ‘फिक्क्या’

बहुजननामा

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

जेष्ठ लेखक आणि आंबेडकरी चळवळींचे अभ्यासक सुहास सोनवणे यांचे निधन

अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी जाहीर करा