माजी भारतीय क्रिकेट कर्णधार धोनीची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी भारतीय क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनी यांनी आम्रपाली ग्रुपच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्रपाली ग्रुपने आपले ४० कोटी रुपये थकविले आहे. ते त्यांनी तातडीने द्यावेत यासाठी धोनी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

एम. एस. धोनी यांनी नोएडातील आम्रपाली या रिअल इस्टेट कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ६ ते ७ वर्षे काम केले. त्याच्याबरोबर भुवनेश्वर कुमार हाही या ग्रुपची जाहिरात करत होता. धोनीचे या कंपनीने १५० कोटी रुपये थकविले होते. आर्थिक अडचणीत सापडलेल्या आम्रपाली ग्रुपची बांधकामे बंद पडली होती. त्यामुळे वेळेवर घर न मिळालेल्या शेकडो लोकांनी धोनी याच्यावर सोशल मिडियावरुन धोनीला लक्ष्य केले होते. त्यामुळे २०१६ मध्ये धोनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करणे थांबविले. मात्र, कंपनीने त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेवटी त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.