धोनीला ‘ति’च्याबद्दल समजताच त्याने ‘त्या’ अनोख्या चाहतीची भेट घेतली ; पहा व्हीडिओ 

सिडनी : वृत्तसंस्था – कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. त्यात सर्व वयोगटातील लोक आहेत. धोनीने त्याच्या खेळाने आणि व्यक्ती म्हणून सर्वांच्या मनात त्याचे वेगळे स्थान निर्माण केलं आहे. सध्या तो त्याच्या धडाकेबाज फॉर्ममध्ये दिसत नाहीय. तरी त्याच्या खेळाबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात विश्वास आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत अशी वन डे मालिका लवकरच सुरु होणार आहे. धोनीवर त्याच्या सध्याच्या खराब कामगिरीमुळे खेळण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत. त्याच्यावर टीका होत आहे. अशा वातावरणातही त्याच्या चाहत्यांना त्याची बॅट या मालिकेत चांलगीच तळपेल, असा विश्वास आहे. त्यामुळे या मालिकेकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने या मालिकेतील कामगिरी धोनीसाठी निर्णायक ठरणार आहे.

धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांचा गराडा ऑस्ट्रेलियात जमायला सुरुवात झाली आहे. त्यातील एका चाहतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गुरुवारी सिडनी ग्राऊंडवर भारतीय संघ इनडोअर स्टेडियमवर सराव करत होता. त्यावेळी ही चाहती तेथे आली. हिचं नाव एडिथ नॉर्मन. त्यांचे वय 87 वर्ष. या आजी धोनीच्या डाय हार्ट फॅन आहेत. त्यामुळे धोनीची भेट घेण्यासाठी त्या त्यांच्या मुलासह सिडनीत आल्या आहेत.

धोनीला आपल्या या अनोख्या चाहतीबद्दल समजताच त्याने चालू सत्र संपवून लगेचच त्यांची भेट घेण्यासाठी बाहेर आला. त्यावेळी त्याने त्या आजींशी खुप वेळ गप्पाही मारल्या. त्याचा हा व्हीडिओ आहे. गप्पा मारतानाही आजी आपल्या नातवाच्या वयाच्या धोनीला डोळेभरून पाहताना दिसत आहेत.

https://twitter.com/msdhoniaddicted/status/1082954820095422464