IPL 2021 : MS धोनीला मोठा फटका ! सलग 33 मॅचमध्ये नॉट आउट राहणारा साडे 6 फुटाचा धुरंधर मालिकेतून बाहेर

पोलिसनामा ऑनलाईन – IPL २०२१ आजून सुरु झाला नाही आणि चेन्नई सुपर किंगला पहिला फटका बसला आहे. त्यांच्या एका खेळाडूने सामन्यातून नाव मागे घेतले आहे. १४ व्या सीझनच्या आधी मैदान सोडणाऱ्या या खेळाडूचे नाव आहे जोश हेडलवूड. होय, IPL २०२१ मध्ये धोनीचा जोश दिसणार नाही. CSK ला त्यांच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने ऐन वेळेवर दगा दिला आहे. जोश हेडलवूड सामन्यातून जाण्याचे कारण केवळ वयक्तिक नाही तर व्यावसायिकही आहे.

ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज जोश हेडलवूडसाठी IPL २०२१ खेळण्यापेक्षा शेफील्ड शिल्ट हा देशांतर्गत सामना खेळणे महत्वाचे आहे. ते त्यांच्या अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी IPL खेळत नाही आहेत. त्यामुळे त्यांनी IPLच्या १४ व्या सत्रातून नाव मागे घेतले आहे.

जोश हेडलवूड IPL २०२१ मधून माघार, ही आहेत कारणे
क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी महत्वाच्या संभाषणात जोश हेडलवूड म्हणाले, ”ते IPL मधून स्वतःचे नाव मागे घेत आहेत. ते आता शेफील्ड शिल्टच्या अंतिम सामन्यावर आपले लक्ष केंद्रित करणार आहेत.” याशिवाय त्यांनी IPL २०२१ मधून माघार घेण्याचे एक कारण सांगतले. ते म्हणाले, ”बायो बबलमध्ये वेगवेगळ्या वेळी राहून १० महिने झाले आहेत. अशावेळी मी क्रिकेटपासून थोडावेळ ब्रेक घेणार आहे आणि काही काळ घरासोबत घालवणार आहे. मी पुढचे दोन महिने येथे ऑस्ट्रेलियमध्ये स्वतःच्या घरी राहणार आहे.” स्पष्ट आहे की IPL २०२१ पासून माघार घेण्याचे कारण फक्त व्यावसायिक नाही तर वैयक्तिकही आहे.

साडे सहा फुटाच्या गोलंदाजाने म्हंटले, ”पुढे क्रिकेटचा हिवाळा हंगाम आहे, ज्यात आम्हाला वेस्टइंडीजचा लांब दौरा करावा लागतो. त्यानंतर बांगलादेशचा दौरा आहे. त्यानंतर T२० वर्ड कप आणि त्यानंतर ऍशेज. म्हणजे पुढील १२ महिने पुन्हा व्यस्त राहतील. अशा परिस्थितीत मी स्वतःला मानसिक आणि शारीरिकरीत्या तयार होण्यासाठी पूर्ण संधी देणार आहे. म्ह्णून मी IPL २०२१ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.” जोश फिलिप्स आणि मिशेल मार्श या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोश हेडलवूडच्या पुढे IPL २०२१ मधून नावे मागे घेतली आहेत.

बाद न होता ३३ सामने खेळण्याचा रेकॉर्ड
खेळातून बाद न होता एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३३ सामने खेळण्याचा विक्रम असलेल्या जोश हेडलवूडने CSK साठी IPL चा शेवटचा हंगाम खेळला. IPL २०२० मध्ये त्याने ३ सामन्यात १ विकेट घेतली.