अभिनेता धर्मेंद्रची सून ‘करोडपती’ बिजनेसवुमेन ; कमाईच्या बाबतीत देते नीता अंबानीला ‘टक्कर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेते धर्मेंद्र आपल्या जमान्यातील सुपरस्टार आहेत. त्यांची पर्सनल लाईफ कधीच कोणापासून लपून राहिली नाही. धर्मेंद्र यांनी दोन लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश राज आहे. अनेकांना माहिती आहे की, त्यांनी दोन लग्न केले आहेत. धर्मेंद्र यांचा लहान मुलगा बॉबी देओलच्या पत्नीबद्दल अनेकांना माहिती नसेल.

बॉबी देओलने अनेक सिनेमात काम केले आहे. त्याने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. रेस 3 या सलमान खानच्या सिनेमातून बॉबी देओलने सिनेमात पुन्हा आगमन केले होते. परंतु मधल्या काळात बॉबीकडे अजिबातच काम नव्हते. बॉबी देओलच्या पत्नीचे नाव तान्या आहे. तान्या देओल एका मोठ्या घराण्यातून आहे. याशिवाय तान्या स्वत: एक बिजनेस वुमेन आहे.

तान्या द गुड अर्थ नावाची एक मोठी फर्निचर आणि होम डेकोरेशन कंपनी चालवते. तान्याचा हा बिजनेस चांगला चालतो. या बिजनेसमधून तान्या लाखोंची कमाई करते. तान्या सौंदर्याच्या बाबतीतही काही कमी नाही. तान्या आणि बॉबीचं लग्न १९९६ मध्ये झालं आहे. तेव्हापासून दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत. बॉबी आणि तान्याचं लव्ह मॅरेज आहे. बॉबीला पहिल्याच नजरेत तान्यावर प्रेम झालं होतं. दोघांना दोन मुलं आहेत. आर्यमन देओल आणि धर्म देओल अशी त्यांची नावे आहेत.

आरोग्यविषयक वृत्त