धुळे : तालुक्यात झालेल्या वेगवेगळया अपघातात 2 जण ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी तालुक्यातील रस्ता अपघातात दोन जणांचा मृत्यु. लामकानी येथील एक महिला. तर मेहुबारे जवळ एक पुरुष ठार झाला.

सविस्तर माहिती की, चाळीसगाहुन परतीच्याच्या प्रवासाकडे लामकानीहुन स्विफ्ट कार क्रं.एम एच 18 / एजे 7835 ह्या गाडीने रुदाणे जात असताना पुलाच्या अलीकडे वळण रस्त्यावर समोरुन येणाऱ्या मोटरसायकल व स्विफ्ट कारचा भिषण अपघात झाला. स्विफ्ट कार रस्त्याबाजूला एक पलटी मारुन उलटली त्यात कारचा तिचा चेंदामेंदा झाला. यातील जखमींना तेथील नागरीकांच्या मदतीने तातडीने 108 क्रं.रुग्णवाहिकेतून चक्करबर्डी येथील हिरे वैद्यकीय रुग्णालायात उपचारार्थ त्यांचे भाऊ भगवान पाटील यांनी दाखल केले.

यात उपचारा दरम्यान संगिता सुधीर भामरे यांचा मृत्यु झाला आहे. 1)दत्ताञय आत्माराम पाटील वय.65 यांची प्रकृती गंभीर आहे. 2)आशाबाई दत्ताञय पाटील (वय 62) जखमी. 3) अलका रामभाऊ पाटील (वय 45) यांचेसह अजुन दोन जण जखमी झाले आहे.त्यांची नावे कळु शकली नाही. उशीरा पर्यत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते.

सोलापुर सुरत महामार्गावर अपघातात एक ठार
धुळ्याहुन चाळीसगावकडे मोटरसायकल क्रं.एम एच 19/डीएस 3635 ने हिम्मत आनंद सोनवणे जात असताना तरवाडे बारी अलीकडे अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाले. त्यांना लळींग टोल नाक्यावरील रुग्ण वाहिका कर्मचारी मसुद खान यांनी हिरे मेडिकल कॉलेज व रुग्णालयात पोसमार्टे करता दाखल करण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like