धुळे : साक्री रोडवरील 2 किराणा दुकाने फोडली, ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – देवपुर पोलीस हद्दीत चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच आहे. गुंगीच्या स्प्रेचा मारा करत बदाम, काजुसह लाखो रुपयांचे सोन्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना साक्री रोड येथे घडली.

सविस्तर माहिती की, बुधवारी पहाटेवेळी एका लाल रंगाच्या चार चाकी गाडीत तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी साक्री रोड येथील जोशी गोंधळी नगरातील किरणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. शटरचा आवाज येताच काही नागरीकांनी आरडाओरडा केला. लोक जागे झाले हा अंदाज येताच चोरटे तेथून पसार झाले. व जवळच रस्ता ओलाडत चोरटे कुमारनगरातील भागात पोहचले.

कुमारनगरातील चौकातच जवळच असलेल्या रस्त्यावरील संतोष कुमार आसुदामल रोहेडा यांचे मालकीचे किरणा दुकानाचे कुलूप तोडुन तीन काचेच्या बरणीत ठेवलेले बदाम, काजु व लाकडी कपटातील स्टील डब्ब्यातील चिल्लर रोख चार ते पाच हजार व गल्ल्यातील रोख रक्कम दहा ते पंधरा हजार रोख रक्कम, महत्वाची कागदपत्रे चोरट्यांनी चोरुन नेली.

चोरटे हे काही अतंर पुढे जात कुमार नगरातील शामजी कृपा दुमजली ब्लॉक नं.क्युआर 4 रुम नं.3 चे कुलूप तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सगळेजण घरातच झोपलेले असताना चोरट्यांनी लाकडी कपाट, लोखंडी कपाट फोडुन कपाटातील 10 ते 12 लाखांचे सोन्यांचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले.

चोरीची माहिती त्यांनी शहर पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळाची पहाणी केली. अधिक तपासकामी मदतीसाठी श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञांची मदत घेण्यात आली.

चोरटे कुमार नगरात फेरफटका मारत असतानाचे सिसीटिव्ही फुटेज तेथील जवळील दोन्ही घरांचे कँमेऱ्यात कैद झाले आहे. त्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. शहर पोलीस ठाण्यात घर मालक हरिराम शिरुमल ठाणवाणी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Visit : policenama.com