Dhule ACB Trap | 2 लाखांची लाच घेताना वीज वितरण कंपनीचे दोन बडे अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (MSEDCL) दोन बड्या अधिकाऱ्यांना दोन लाख रुपये लाच घेताना (Accepting Bribe) धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Dhule ACB Trap) रंगेहाथ पकडले. वीज वितरण कंपनी अंतर्गत केलेल्या वीज जोडणीचे बिल विना त्रुटी मंजूर करण्याच्या मोबदल्यात 5 लाख रुपये लाचेची मागणी अधिकाऱ्यांनी केली होती. त्यापैकी 2 लाख रुपये घेताना धुळे एसीबीच्या पथकाने (Dhule ACB Trap) कंपनीच्या धुळे येथील वित्त व लेखा विभागाच्या व्यवस्थापक व उप व्यवस्थापकास लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

 

व्यवस्थापक अमर अशोक खोंडे Manager Amar Ashok Khonde (वय 41 रा. प्लॉट नंबर 14 अशोक नगर,जमनागिरी रोड, धुळे), उपव्यवस्थापक मनोज अरुण पगार Deputy Manager Manoj Arun Pagar (वय 46 रा.विवेकानंद कॉलनी, करगाव रोड, चाळीसगाव) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत शासकीय नोंदणीकृत ठेकेदाराने (वय-41 रा. नंदुरबार) धुळे एसीबीकडे (Dhule ACB Trap) तक्रार केली आहे.

 

तक्रारदार हे शासकीय नोंदणीकृत ठेकेदार (Government Registered Contractor) आहेत. त्यांनी मराविवि कंपनी अंतर्गत जिल्हा नियोजन योजनेत धुळे मंडळ कार्यालय अंतर्गत वीज जोडणी संदर्भात 2018-19 या वर्षात ठेका घेऊन 56 लाख 31 हजार 590 रूपयांचे काम पूर्ण केले होते. त्या कामाच्या सादर केलेल्या बिलात त्रूटी न काढता प्रलंबित बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात अमर खोंडे व मनोज पगार यांनी तक्रारदाराकडे 5 लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती अडीच लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार केली.

एसबीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता तक्रारदार यांचे प्रलंबित बिल काढण्यासाठी अमर खोंडे व
मनोज पगार यांनी 5 लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती अडीच लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
मागणी केलेल्या रक्कमेपैकी पहिला हप्ता दोन लाख रुपये स्वीकारताना अमर खोंडे व मनोज पगार यांना त्यांच्या केबीनमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर (DySP Anil Badgujar), पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे (Police Inspector Prakash Zodge)
पोलीस अंमलदार शरद काटके, संतोष पावरा, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, सुधीर मोरे,
रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे यांच्या पथकाने केली.

 

Advt.

Web Title :- Dhule ACB Trap | Two big officials of mahavitaran company in anti-corruption net while taking bribe of 2 lakhs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

International Women’s Day | दलित महिला उद्योगविश्वात यशाचे शिखर गाठू शकतात – पद्मश्री मिलिंद कांबळे

Nandurbar Police – International Women’s Day | जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार महिला पोलिसांची बाईक रॅली

Pune Crime News | कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या