Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – Dhule Accident News | राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. धुळे जिल्ह्यात असाच एक अपघात झाला आहे. यामध्ये अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास नरडाणा उड्डाणपुलावर हा भीषण अपघात (Dhule Accident News) झाला. या अपघातानंतर आरोपी वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

काय घडले नेमके?
राकेश प्रताप खैरनार Rakesh Pratap Khairnar (वय 26) व दीपक साहेबराव शिरसाठ Deepak Sahebrao Shirsath (वय 21, दोन्ही रा. दत्तवायपूर, ता. शिंदखेडा) अशी या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. राकेश व दीपक हे दोघे अगदी जिवलग मित्र होते. ते काल घरगुती कामानिमित्त आपल्या दुचाकीने नरडाणा येथे गेले होते. आपले काम आटोपून रात्री घरी परतत असताना नरडाणा उड्डाणपुलावर (Nardana Flyover) त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि यामध्ये राकेश खैरनार हा दुचाकीवरून उड्डाणपुलाखाली फेकला गेला, तर दीपक रस्त्यावर पडला.

यानंतर त्यांना तातडीने नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Nardana Primary Health Centre) दाखल
करण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाताप्रकरणी (Dhule Accident News)
काल रात्री उशिरापर्यंत नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मृत राकेश हा ऑटो चालवून तर दीपक मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होते.
राकेश खैरनारच्या माघारी आई, वडील भाऊ असा परिवार आहे. तर दीपक शिरसाठच्या माघारी आई, वडील,
चार बहिणी असा परिवार आहे. या दोघा मित्रांच्या अशा अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली
जात आहे.

Web Title :-Dhule Accident News | two youth dies in road accident in dhule while returning to home

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | ‘राहूल गांधींना ‘त्या’ जेलमध्ये ठेवलं पाहिजे अन् घाण्याला जुंपलं पाहिजे’, सावरकरांच्या विधानावरुन मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

Former MLA Harshvardhan Jadhav | ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करताच हर्षवर्धन जाधवांनी दंड थोपटले, दानवे बाप-लेकीच्या विरोधात निवडणूक लढवणार