18,000 हजारांची लाच घेताना वीज वितरण कंपनीच्या वायरमन सह सहाय्यक लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – 18,000 हजारांची लाच घेताना वीज वितरण कंपनीच्या वायरमन सह सहाय्यक लेखापाल एसीबीच्या जाळ्यात अडकले. यातील तक्रारदार हे नंदूरबार येथील राहणारे असून त्यांना आरोपी लोकसेवक यांनी त्यांच्या घराचे इलेक्ट्रिक मिटर faulty असून मागील 10 महिन्याचे 1 लाख 25 हजार इतके बिल भरावे लागेल असे सांगून बिल कमी करण्यासाठी आरोपी लोकसेवक 1 व 2 यांनी तक्रारदारकडे दिनांक 30/11/2019 रोजी 20, 000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती
18,000 ₹ लाचेची मागणी करून सदर लाच आज दि .4/12/19 रोजी आरोपी लोकसेवक क्रमांक 1 वायरमन धनंजय कानडे यांनी पंचासमक्ष मंगळ बाजारात तक्रारदाराच्या दुकानाजवळ स्वीकारली असून त्यास जागीच ताब्यात घेऊन आरोपी लोकसेवक क्रमांक 2 ठाकूर यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपींची नावे

1) धनंजय भिका कानडे (वय 31 वर्ष) MSEB नंदूरबार तंत्रज्ञ (वायरमन) रा. नंदूरबार (वर्ग 3)

2) जितेंद्र गुलाब ठाकूर (वय 38 वर्ष) MSEB सहा. लेखापाल नंदूरबार रा. नंदूरबार (वर्ग 3)

हि कारवाई पो. अधिक्षक सुनिल कडासने अप्पर पोलीस अधिक्षक ला. प्र. वि. नाशिक निलेश सोनवणे यांचे मार्गदर्शनाने पोलीस उप अधिक्षक शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिरराव, पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, पो हवा. उत्तम महाजन, संजय गुमाणे, पोना दीपक चित्ते, संदीप नावडेकर, अमोल मराठे, मनोज अहिरे, मनोहर बोरसे, मपोना ज्योती पाटील आदींनी केली आहे.