धुळे : अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणार्‍यांना अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – आझाद नगर पोलीसांनी गिंदोडीया चौकात लक्झरी बस मधुन 1 लाख 36 रुपयांचे तंबाखु जन्य पदार्थ भरलेले 12 खोके जप्त केले.

सविस्तर माहिती की, जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी लावण्यात आली. आझाद नगर पोलीस ठाणे अतंर्गत गिंदोडीया चौकात नाका बंदी सुरु असताना वाहन तपासणी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लक्झरी बस जळगावकडे जाताना पो. कॉ. आव्हाड यांनी थांबविली. गाडीची तपासणी करण्यास सुरवात केली असता लक्झरी बस मधील चालकाचे सिटाखाली 12 खोके पँकिंग करुन ठेवलेले लपविले आढळले.

त्याची तपासणी केली असता अवैधरित्या वाहतुक करताना त्यात तंबाखुजन्य पदार्थ आढळुन आल्याने बस चालक शेख आफिज शेख अजिज (वय.32) व क्लिनर विकास काळु नेगवाल (वय.25, रा. उदयपुर) यांना चौकशी कामी ताब्यात घेतले आहे. लक्झरी बससह एकुण मालाची किंमत 31 लाख 36 हजार रुपयांचा माल आझाद नगर पोलीसांनी नाकाबंदी दरम्यान पोलीस अधिक्षक पांढरे यांचे आदेशाने कारवाई करुन ताब्यात घेतला आहे.

Visit : Policenama.com