धुळे : जि.प. निवडणूकीत भाजपनं रचला इतिहास, 56 पैकी 39 जागांवर विजय

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे आले आहे. यात ५६ जागांचा निकाल हाती आला आहे. यात ३९ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब केला आहे.

Dhule

यात शिरपूर तालुक्यातील संपुर्ण १४ जागा, शिंदखेडा तालुक्यात ८, साक्री तालुक्यात ७ आणि धुळे तालुक्यात १० याप्रमाणे ३९ जागांवर विजय संपादन केला. तर, काँग्रेसने ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ३ जागा तर शिवसेनेने ४ जागा मिळविल्या आहे. याशिवाय अपक्ष ३ उमेदवार यात विजयी झाले आहे. माजी मंत्री अमरीश पटेल यांच्या प्रयत्नामुळे भाजपला हे लक्ष गाठता आले आहे.

या निकालानंतर बहुमतांसाठी २९ जागी विजय प्राप्त करत ३९ जागा मिळवत भाजपने मोठे यश संपादन केले.

अंतिम निकाल :
भाजप ३९,  काँग्रेस ७,  राष्ट्रवादी ३,  शिवसेना ४,  अपक्ष ३ जागा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/