जिल्हा न्यायालय रक्तदान शिबिर संपन्न

धुळे : देशात कोरोना,कोव्हीड-19 महामारीमुळे रक्त तुडवडा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. राज्यमंत्री यांनी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे.असे आव्हाहन जनतेला करण्यात आले.त्याच निमित्ताने धुळे जिल्हा न्यायालयात मंगळवारी सकाळी 9.30 ते 2 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा न्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ,नवजिवन ब्लड बँक वतीने जिल्हा न्यायालय आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभाग सभागृहात सोशल डिस्टसिंग व सेनेटायझरचा वापर करून रक्तदान शिबीरात न्यामुर्ती,वकील, अधिकारी, कर्मचारी यांनी रक्तदान केले.

यावेळी न्यामुर्ती मंगला थोटे,न्यामुर्ती एस आर उगले, न्या.डि यू डोंगरे,जिल्हा न्यायाधिश ए डी क्षिरसागर, जिल्हा न्यायाधीश एस एच सैय्यद,जिल्हा न्यायाधिश एम जी चव्हाण, जिल्हा न्यायाधिश एच ए मुल्ला ,तदर्थ न्या.जे ए शेख, वकिली संघाचे अध्यक्ष डी.जी पाटील,समीर पंडित,डि वाय तवंर, डॉ.सुनिल चौधरी,आदी उपस्थित होते.

यावेळी 100 ते 125 बॅग रक्तदान झाले.उत्सफुर्तैपणे प्रतिसाद मिळाला. न्यायमुर्ती थोटे यांनी सांगितले की कोरोना महामारीत रक्तदान शिबीर सहभाग नोंदवून रक्तदान केले.त्या सगळ्यांचेच कौतुक केले आहे.