धुळे : गरताड बारी घाटात ‘द बर्निंग कार’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन  – सूरत-सोलापूर महामार्गावर गरताड बारी घाटात सायंकाळी 6. 30 च्या दरम्यान अचानकपणे धुळ्याहून चाळीसगावकडे जाणाऱ्या मारुती ओम्नी व्हॅनला गरताड गावाच्या पुढील तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गरताड बारी घाटात अचानकपणे आग लागली. यात मारुती व्हॅन आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

याबाबत मोहाडी पोलिसांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी काही मिनिटात दाखल झाले. त्यांनी आगीवर पाणी मारा करून आग आटोक्यात आणली परंतु मारुती व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आग आटोक्यात आणल्यानंतर मारुती व्हॅन क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अग्नी उपद्रव 3 व 7 प्रमाणे उशिरापर्यंत मोहाडी पोलीसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सपोनि करीत आहेत.