धुळे : देवपुरात घरफोडी करुन सोन्याचे दागिने लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – देवपुरातील विद्यानगरीत व्यावसायिकाचे घर फोडुन चोरट्यांनी सोन्यांचे दागिने व हजारो रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, योगेश अशोक थोरात यांचे देवपुर परिसरातील विद्या नगरीत घर आहे. घरातील सर्वजण हाॅलमध्ये झोपलेले होते. पहाटेच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने व 25 हजार रुपये रोख रक्कम असा एकून दिड लाखाचा माल चोरट्यांनी लंपास केला. थोरात कुटूंबिय सकाळी साडेसहा वाजता झोपेतून जागे झाले त्यावेळी चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलीस ठाणे गाठत याबाबत पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळाची पहाणी करुन फिंगरप्रिंट तज्ञ, श्वान पथकाची मदत घेऊन तपास केला. पुढील तपास देवपूर पोलीस करत आहेत.