धुळे : केंद्रीय पथकाकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

धुळे तालुक्यातील पुरमेपाडा, आर्वी, मुकटी शिवारात शेतकऱ्यांशी साधला संवाद

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या महिन्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘क्यार’ या चक्रीवादळामुळे अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील बाधित पिकांच्या पाहणीसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर येथील प्रकल्पाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाचे खर्च विभागाचे सल्लागार श्री. दीना नाथ आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी आज दुपारी धुळे तालुक्यातील पुरमेपाडा, आर्वी आणि मुकटी शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी गंगाधरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार किशोर कदम, उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाने, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे आदी उपस्थित होते.

डॉ. सुभाष चंद्र यांनी सांगितले, की पीक परिस्थितीची पाहणी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यात येईल. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी पिकांच्या नुकसानीची सविस्तर माहिती करून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केंद्रीय पथकातील सदस्यांना धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. यावेळी महसूल, कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like