धुळे : दसऱ्याआधीच चोरट्यांनी धूम स्टाईलने ‘सोने लुटले’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी सिमोल्लंघन करुन सोने लुटण्याची पध्दत आहे. परंतु दसऱ्याअगोदरच चोरट्यांनी धुम स्टाईलने सोने लुटून दसराच साजरा केलाय अशी चर्चा परिसरात रंगली होती.

शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. चोरट्यांना शोधण्यासाठी सीसीटिव्ही फुटेजचा आधार पोलीसांना घ्यावा लागत आहे. परंतु चोरटे मस्त व पोलीस सुस्त असेच चित्र दिसत आहे. गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात सोनसाखळी चोरटे मस्तावलेले आहेत. पोलीस जणू हतबल झालेलेच दिसत आहे.

शहरातील देवपुर परिसरातून सेवानिवृत्त प्राध्यापिकेची लाखों रुपयांची सोन्याची मंगलपोत धुम स्टाईलने चोरट्यांनी लंपास केली आहे. सविस्तर माहिती की, देवपुर परिसरातील छत्रपती नगर आर. डी. गांधी कॉम्पलेक्सचे पाठिमागील गुलाबराव बेहरेचे घरासमोरील रस्त्याहुन घरी परत जात असलेल्या सेवानिवृत्त डॉ. प्रा. उषा साळुंखेंच्या गळ्यातील सोन्याच्या दोन पदरी मोती पोळ्याची मंगलपोत (40 ग्रॅम) व सोन्यांचा गोफ (20 ग्रॅम) असे दागिने दोन अज्ञात व्यक्तींनी समोरुन मोटरसायकलवर भरधाव वेगाने येऊन सांळुखेच्या गळ्यातील सोन पोत, गोफ ओरबडुन नेत पसार झाले. यावेळी महिलेने आरडाओरडा केला. परंतु काही फायदा झाला नाही. महिलेने देवपुर पोलीस ठाणे गाठत दोन व्यक्ती 30 ते 35 वयोगटातील मोटरसायकल स्वारांविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

सीसीटिव्हीत कैद झालेल्या चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहे. या अगोदर चोरट्यांनी कुमार नगरात व देवपुरातील स्मशानभुमी जवळील घरातून सोन्यांचा लाखों रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्याचा तपास लागलेला नाही.

Visit : Policenama.com