धुळे : शिरुड गावात ग्रामस्थांच्या सर्तकतेमुळे चोरट्यांच्या दिवाळीवर ‘विर्जण’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच आहे.चोरटे मस्तावले,पोलीस सुस्त अशीच स्थिती दिसून येत आहे. शिरुड मध्ये ग्रामस्थांच्या सर्तकतेमुळे चोरट्यांच्या दिवाळीवर विर्जण पडले.

सविस्तर माहिती की, धनतेरसच्या दिवशी तालुक्यातील शिरुड गावात मध्यराञी मोठी घटना ग्रामस्थांच्या सर्तकतेने टळली.गावातील चौकात असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रयत्न केला. तो फसला. सध्या बँकेना तीन ते चार दिवस सुट्या असल्याने बँकेत व्यवहार होणार नाही .एटीएम मशीन मध्ये रोख रक्कम भरलेली आहे.

याचाच फायदा चोरट्यांननी घेत दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न होता तो फसला. धनोञयदशीच्या मध्य राञी शिरुड गावातील ग्रामस्थ झोपी गेले असता.चोरट्यांनी गाडीला साखळी मशीनला बांधुन तोडुन चोरुन नेण्याचा प्रयत्न केला.मशीन तोडले. व ते साखळीला बांधुन बाहेर रस्त्यावर नेताना मशीनचा घर्षणाने मोठा आवाज झाला.काही ग्रामस्थांना जाग आली.एवढा मोठा आवाज कसला झाला.या करीता ग्रामस्थांनी एकमेंकांना हाक देत जवळ जमत गर्दी केली.

आवाजाच्या दिशेने पाहिले असता मंदिराजवळुन दुरुनच मशीन खेचून नेत असल्याचे दिसले.ग्रामस्थांनी जोरजोराने आरडाओरड सुरु केली. अन्य ग्रामस्थ हि गावात मोठी घटना घडली या भितीने साखर झोपेतून खडाडुन जागे झाले व आवाजाच्या दिशेने अन्य मार्गाने पुढे गेलेल्या ग्रामस्थांच्या पाठिमागे धावत सुटले.पुढे चोरटे व पाठिमागे ग्रामस्थ पाठलाग करत आहे.हे लक्षात येताच चोरट्यांनी गाडीला वेग दिला.त्यात मशीनचा लोखंडी तार तुटला.चोरटे मशीन तिथेच सोडुन भिती पोटी पसार झाले. ग्रामस्थांच्या सर्तकतेने मोठा प्रसंग टळला.

तालुका पोलीसांना या बाबत माहिती देण्यात आली. नंतर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळ व एटीएम मशीन रस्त्यावर पडलेले आहे. त्या ठिकाणी पहाणी केली.या अगोदर मालेगाव रोड परिसरातून पहाटेच्यावेळी चोरट्यांनी एटीएम मशीन तोडुन चोरुन नेले होते.ते एटीएम मशीन मालेगाव मधील नदी पाञात कटरने तोडलेला सांगाडा पोलीसांना लोकांच्या मदतीने मिळाला होता.

या अगोदर काही महिन्यापुर्वी चोरट्यांनी शिरुड गावात एकाच राञी पाच ते सहा घरे फोडुन सोने,चांदी,रोकड असा लाखों रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला होता.त्याचा हि तपास लागलेला नाही.

Visit : policenama.com