Dhule Crime | धुळे हादरलं! पत्नीची धारदार शस्त्राने हत्या करून पतीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – Dhule Crime | धुळ्यामध्ये पती- पत्नीच्या नात्याला हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी पतीने पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात हि घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून किरकोळ कारणामुळे या आरोपी पतीने पत्नीची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःदेखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या आरोपी पतीवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृतीदेखील चिंताजनक आहे. (Dhule Crime)

काय आहे नेमके प्रकरण?
किरणबाई मोरे वय 40 असे मृत पत्नीचे नाव आहे. त्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर आपल्या पतीपासून होणाऱ्या त्रासाची तक्रार दाखल करण्यासाठी साक्री पोलीस स्टेशन येथे गेल्या होत्या, मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल साक्री पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. जर पोलिसांनी वेळेवर संबंधित महिलेच्या तक्रारीची दखल घेतली असती, तर आज ही वेळ मृत महिलेवर ओढवली नसती. तसेच तिच्या मृत्यूला साक्री पोलीस जबाबदार असल्याचा देखील आरोप नातेवाईकांनी केला आहे. (Dhule Crime)

जालन्यामध्ये शिक्षिकेची पाण्यात उडी घेऊन आत्महत्या
जालना जिल्ह्यातील मोती तलावाच्या चौपाटीवरून पाण्यात उडी घेत एका 45 वर्षीय महिला शिक्षिकेने
आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
जयश्री गणेश पोलास असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षिकेचे नाव असून त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
त्यांचे पती गणेश पोलास हे नायब तहसीलदार आहेत.
जयश्री यांनी अचानक एवढे मोठे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. चंदनझिरा पोलिस
या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :- Dhule Crime | husband takes wife life later ended his life in dhule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर टीका; म्हणाले…

Pune Kasba Peth Bypoll Election | जाती-धर्माच्या भिंतीपालिकडला ‘आपला माणूस’ रविंद्र धंगेकर यांना काँग्रेस कडून कसबा मतदार संघातून उमेदवारी; महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन करत भरला धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज

Rohit Pawar | रोहित पवारांचा BJP ला टोला; म्हणाले – ‘ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देणे हा भाजपचा डाव…’