धुळे : 52 हजार 310 रुपयांचा मद्यसाठासह कार जप्त; एकाला अटक

धुळे :  पोलीसनामा ऑनलाइन – तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना खबरीमार्फत गोपनिय माहिती मिळाली. त्या आधारे पोलीसांनी एक पथक तयार करुन तातडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे वेल्हाणे गावातील शिवारात पोहचले तिथे जवळपास शोधाशोध केली असता, काटेरी झाडाच्या आडोशाला लावलेली बेवारस स्थितीत उभी करुन ठेवलेली एक इंडिको कार क्रं.एम. एच. 18 / एक्स 111 हि दिसली. त्या ठिकाणी येणारे जाणारे यांना विचारपूस केली असता माहिती नाही असे काही नागरीकांनी पोलीसांना सांगितले. पोलीसांनी गाडीची तपासणी केली असताना गाडीच्या डिक्कीत पुठ्याच्या खोक्यात व प्लास्टिक गोणीत –

1) टँगो कंपनीची देशी दारुच्या 230 नग बाटल्या किंमत 11960
2) मॅक डोवेल्स कंपनी विदेशी दारुच्या बाटल्या 185 नग किंमत 27750
3) इंपेरीयल ब्ल्यु कंपनीच्या विदेशी दारुच्या बाटल्या 90 नग एकुण 12600 रुपये
4)इंडिको कार किंमत 1 लाख रू.
असा एकुण 152310 रुपयांचा माल विना परवाना कब्जात बाळगतांना मिळुन आल्या प्रकरणी एका जणाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. एक फरार झाला आहे.

सगळा माल तालुका पोलीसांनी जप्त करुन तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ.राजु भुजबळ, ग्रामिण उपविभागिय अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक सुखदेव भोरकडे, संजय साळवे, जितेंद्र सोनार, सुनिल जावरे, अमोल कापसे, राकेश शिरसाठ, हेमंत बोरसे, वानखेडे यांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/