धुळे : ‘लव्ह मॅरेज’ केलेल्या मुलीला ‘भस्म’ लावून ‘जादूटोणा’, मांत्रिकासह सासरच्या मंडळीवर FIR

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – लव्ह मॅरेज करून आलेल्या मुलीला काही दिवस सासरच्या मंडळीकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र, वडिलांकडून तिला पाच लाख रुपये मिळणार आहेत हे लक्षात आल्यावर सासरच्या मंडळींनी तिच्या अंगात काळी बाई येते म्हणत मांत्रिकाकडे नेवून अंगाला भस्म लावून जादूटोना केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुलीचा काही दिवसांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. सर्व काही ठीक सुरु होतं. मात्र, मुलीच्या वडिलांकडून मुलीला पाच लाख रुपये मिळणार आहेत असे समजताच मुलीच्या सासरच्या मंडळींनी मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिला घरात डांबून ठेवण्यात येत होते. तिच्या अंगात काळी बाई येते म्हणत तिला मांत्रिकाकडे नेवून अंगाला भस्म लावण्यात आले. जादूटोणा करून तिला घरी आणल्यानंतर घरात डांबून ठेवण्यात आले. भस्म लावल्याने मुलीच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. पळून जावू नये म्हणून कडेकोट पहारा ठेवला जात होता. मात्र, एके दिवशी काही कामानिमीत्त घराची कडी लावून सर्वजन बाहेर गेले होते. त्यावेळी मुलीने प्रसंगावधान साधून स्वत:ची सोडवणूक केली आणि काका चे घर गाठले. सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर पोलीस ठाणे गाठत मांत्रिकासह सासरच्या चौघांविरूद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपसा पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like