धुळे : शहर पोलीस ठाणे हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरट्यांकडून डंपर व बोलेरो कार लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी गाड्या चोरी सत्रात वाढ झाली आहे.
चोरटे काही दिवसांच्या ब्रेक नंतर परत सक्रीय झाले आहेत.

सविस्तर माहिती की शहरातील शहर पोलीस ठाणे हद्दीतील चक्करबर्डी भागात राहत असलेले चालक दशरथ शंकर कुसळकर यांचें घराच्या अंगणात उभा असलेला डंपर चोरट्याने मध्य रात्री लंपास केला.

या प्रकरणी कुसळकर यांनी एम एच 18 / ए ए 7518 क्रंमाकाचा घरासमोरील अंगणात उभा असलेला डंपर चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी शहर पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे आज शहरात मध्यरात्री डॉक्टरांच्या घरासमोर रस्त्यावर उभी असलेली त्यांच्या मालकीची बोलेरो कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केले याप्रकरणी सुद्धा शहर पोलीस ठाण्यांमध्ये डॉक्टर गणेश ठाकरे यांनी लेखी तक्रार नोंद केली आहे शहरात सध्या चारचाकी वाहनांच्या चोरी सत्रात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चार चाकी चोरांना पकडण्याचे मोठे आव्हानच शहर पोलिसांसमोर आहे.