Dhule Crime News | धुळे हादरलं ! दिवसाढवळ्या भर वस्तीत प्राणघातक हल्ला करत तरुणाची हत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – Dhule Crime News | राज्यात सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धुळे जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. यामध्ये घरातील एकुलता एक असलेल्या 22 वर्षीय तरुणाचा दिवसाढवळ्या भर वस्तीत खून करण्यात आला आहे. काल सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Dhule Crime News)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
शिरपूर शहरातील शिंगावे गाव शिवारातील बालाजी नगर भागात राहणाऱ्या राहुल राजू भोई या 22 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. धारदार शस्त्राने पोटात वार करुन त्याचा खून करण्यात आला. यानंतर राहुलला जखमी अवस्थेमध्ये तातडीने क्रांतीनगर भागातील भद्रा चौक येथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी राहुल राजू भोई याला तपासून मृत घोषित केले. (Dhule Crime News)

 

या घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व शोध पथक शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे. यावेळी तरुणांची शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. यावेळी ज्या व्यक्तीने राहुल याच्यावर वार करून त्याचा खून केला तोदेखील रक्तबंबाड झाला आहे. मात्र संशयित आरोपी अद्याप फरार असून शिरपूर पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

 

Web Title :- Dhule Crime News | a youth in shirpur of dhule district lost life in a attack

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aurangabad Crime News | सुसाईड नोट लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; औरंगाबादमधील घटना

Raigad District Bank Fire | रायगड जिल्हा बँकेला भीषण आग; कागदपत्रे एका क्षणात जळून खाक

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास