Dhule Crime News | काळाने केला घात ! रुद्राक्ष महोत्सवाला जाताना स्कॉर्पिओच्या धडकेत नणंद भावजयीचा दुर्दैवी मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – Dhule Crime News | महाशिवारात्री जवळ आल्यामुळे देशभरात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. महाशिवरात्रीनिमित्ताने अनेक भाविक दर्शनासाठी विविध ठिकाणी जात असतात. मध्यप्रदेश येथील सिहोरमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोफत रुद्राक्ष वाटप करण्यात येत आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील नणंद भावजयीचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील देवास बायपास रोडवर घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शिंदखेड्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Dhule Crime News)

 

काय घडले नेमके?
मध्य प्रदेशातील सिहोर येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी धुळे जिल्ह्यातून असंख्य भाविक जात असतात. या कार्यक्रमात शिंदखेडा शहरातील माळीवाड्यातील जनता नगर भागातील महिला सहभागी होण्यासाठी जायला निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान त्या जेवणासाठी देवास बायपास रोडलगतच्या उपहारगृहात थांबल्या होत्या. जेवण झाल्यानंतर रस्ता क्रॉस करत असतांना भरधाव वेगातील स्कॉर्पिओ त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत मंगलाबाई अभिमन जाधव ( वय 44) या गंभीर जखमी झाल्या. तर त्यांची नणंद सुनंदाबाई रवींद्र मिस्तरी (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाला. (Dhule Crime News)

या अपघातात जखमी झालेल्या मंगलाबाई अभिमन जाधव यांना तातडीने शिरपूर येथील कॉटेज रूग्णालयाात दाखल करण्यात आले.
मात्र,त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. हा अपघात काल रात्री 9 च्या सुमारास घडला आहे.
एकाच परिवारातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुनंदाबाई मिस्तरी यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. तर मंगलाबाई यांच्या पश्चात पती,
दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

 

Web Title :- Dhule Crime News | on the way to rudraksh festival sister in law brother passes away in a scorpio collision

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून खून करुन पतीने विष प्राशन करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना