Dhule Crime | व्याजाच्या बदल्यात सावकाराची महिलेकडे शरीरसुखाची मागणी, 12 जणांवर FIR

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी सावकारी (Private Money Lender) करणं कायद्याने गुन्हा आहे. मात्र, कायद्याला (Law) केराची टोपली दाखवून हा धंदा जोरात सुरु आहे. गरजू लोकांना पैसे देऊन त्यानंतर व्याजासाठी त्यांना वेठीस धरून जादा व्याजदराने (Interest Rate) पैसे घेण्याचे प्रकार समोर येत आहेत. खासगी सावकार सामान्य नागरिकांची आर्थिक लूट करतात. अशा सावकारांवर कायद्याचा वचक राहिलेला नाही. अशीच एक घटना धुळे जिल्ह्यात (Dhule Crime) घडली आहे. धुळे जिल्ह्याच्या (Dhule Crime) पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या (West Deopur Police Station) हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी सावकाराने एका तरुण दाम्पत्याला (Young Couple) बेदम मारहाण (Beating) केली . नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने व्याजाच्या पैशांच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची (Sexual Relation) मागणी (Demand) केली. हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणाने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात धाव घेत सावकाराविरुद्ध फिर्याद दाखल केला. पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 6 ऑक्टोबर 2020 ते 25 मार्च 2022 दरम्यान घडला.(Dhule Crime)

दरम्यानच्या काळात आरोपींनी पैशांसाठी वेळोवेळी मारहाण आणि दमदाटी करुन दाम्पत्याला त्रास दिला. घटनेच्या दिवशी 25 मार्च रोजी आरोपींनी फिर्यादी तरुणाला आणि त्याच्या पत्नीला काठीने मारहाण केली. या घटनेत गरोदर (Pregnant) असलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली. यामुळे बाळाला धोका निर्माण झाला आहे. मारहाणीनंतर आरोपी जितेंद्र बैसाणे (Jitendra Baisane), समीर गवळी (Sameer Gawli) आणि कल्याण गरुड (Kalyan Garud) यांनी फोन करुन फिर्यादीच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली.

या प्रकारानंतर पीडित दाम्पत्याने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी खासगी सावकार प्रतिबंधक अधिनियमासह इतर कलमांतर्गत 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. व्याजाच्या बदल्यात शरीर संबंधाची मागणी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

web title : Dhule Crime | private money lender demand physical relation for interest money crime in dhule fir lodged on 12

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा