धुळे : देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयास चीनच्या शिष्टमंडळाची भेट, थ्री डी प्रिंटींग टेक्नॉलॉजी सेंटरचा शुभारंभ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – अभियांत्रिकी शिक्षणासाठी नामवंत व सर्वाधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट द्वारे नोकरी देण्यात अग्रेसर असणाऱ्या श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आज दि. 18 जानेवारी रोजी  ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाद्वारे आयोजित सेंटर ऑफ एक्सीलन्स इन थ्री डी प्रिंटींग टेक्नॉलॉजी च्या शुभारंभास चीन च्या शिष्टमंडळाने मुंबई येथील मान्यवरांसह भेट दिली. व उत्तर महाराष्ट्र विभागातील अधिकृत व एकमात्र थ्री डी प्रिंटींग टेक्नॉलॉजी सेंटर चे औपचारिक उद्घाटन देखील केले.

याप्रसंगी चीन च्या शेंझेन मधील अ‍ॅनेट टेक्नॉलॉजी चे संस्थापक डेव्हिड लियू, मिस झोई वँग मार्केटिंग हेड अ‍ॅनेट टेक्नॉलॉजी व श्री. बिभू मोहपात्रा चिफ ऑपरेटींग ऑफीसर थ्री आयडिया टेक्नॉलॉजी मुंबई, तसेच श्री. मिलर खंधार सी. ई. ओ. ट्रिझेक ई सोल्यूशन्स मुंबई व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील, ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. प्रसाद विंचूरकर व्यासपीठावर उपस्थित होते. थ्री डायमेन्शनल प्रिंटींग टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा वापर विकसित करणे, त्याचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण, व त्या योग्य भावी अभियंत्यांना मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोजगार संधी या सर्व बाबींचा सुयोग्य विचार करून हा सामंजस्य करार करण्यात आला. चीन मधील अ‍ॅनेट टेक्नॉलॉजी चे संस्थापक डेव्हिड लियू व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच थ्री डी प्रिंटींग टेक्नॉलॉजी सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. त्याचीही पहाणी मान्यवरांनी केली व समाधान व्यक्त केले. सर्व मान्यवरांचे प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. प्रसाद विंचूरकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.

या प्रसंगी विभाग प्रमुख प्रा. डॉ एस. डी. सूर्यवंशी,  प्रा. डॉ. एस. के. दुबे,  प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. विजय उपरिकर,  प्रा. डॉ. एस. एन. जैन,  प्रा. के. एन. पवार,  प्रा. भालचंद्र मांडरे,  प्रा. प्रकाश बाविस्कर तसेच सर्व विभागातील वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते. प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील यांनी महाविद्यालयाच्या विविध विभागांची व कामकाजाची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. व सामंजस्य करार संपन्न झाल्या बद्दल समाधान व्यक्त केले. चीन मधील डेव्हिड लियू यांनी दुभाषक मिस झोई वँग यांच्या माध्यमातून चिनी भाषेत मनोगत व्यक्त केले. ते उपस्थितांना इंग्रजी मधून ऐकवण्यात आले. त्यांनी मनोगतातून देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केल्या बद्दल अभिनंदन केले.

मुंबई येथील थ्री आयडिया टेक्नॉलॉजी चे श्री. बिभू मोहपात्रा यांनी थ्री डायमेन्शनल प्रिंटींग टेक्नॉलॉजी तंत्रज्ञाना संदर्भात नाविन्य पूर्ण माहिती उपस्थितांना टेक्नॉलॉजी सेंटर मध्ये दिली व या तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद केले. प्रा. रिमा कालडा,  प्रा संदिप भामरे,  आनंद कुलकर्णी, भटू पाटील, सुनील पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. अशी माहिती जनसंपर्क प्रभारी आनंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like