घरात ठेवलेल्या मंडप साहित्याला आग लागून आगीत लाखों रूपयांचे नुकसान

धुळे  : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहराजवळील तिखी गावाबाहेरील घर वजा गोडावून मध्ये ठेवलेले लग्न मंडपाचे साहित्य आगीत जळून खाक लाखों रुपयांचे नुकसान.सुदैवाने जिवीतहानी नाही.

देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना.लॉक डाऊनचा चौथा टप्पा सुरू असताना उन्हाळ्यात लग्न सराईचा सिझन असतो.लॉक डाऊन मुळे व्यवसाय ठप्प आहे.काही मंडप व्यवसायकांवर बंद मुळे उपासमारीची वेळ आली आहे.अशात काल सोमवारी रात्री उशिरा तिखी गावात मंडप व्यवसाय करणारे अनिल पाटील यांनी गावाबाहेरील काही अंतरावर असलेल्या एका घरात गोडावून चा उपयोग करत लग्न मंडपाचे साहित्य खुर्चा,टेबल,गाद्या,कनात,झालर,मोठे कापड,स्टेज असे साठवून बंद करून ठेवले होते.ठिकाणी वीज पुरवठा नव्हता अशातच अचानकपणे ह्या घर कम गोडावून मधील साहित्याला अचानकपणे आग लागली. गावात दुरूनच धुर व आग लागल्याचे ग्रामस्थांचे लक्षात आले.त्यांनी आरडाओरड करत गोडावून दिशेने धावले.याचवेळी गावातील सरपंच श्रीराम गिरधर पाटील यांनी आगीची माहिती धुळे मनपा अग्निशामक कार्यालयात कळवली.काही मिनिटात फायरमन राजन महाले, सचिन करनकाळ, योगेंद्र जाधव,भूषण अहिरे हे घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी आगीवर पाणी मारा करून आग आटोक्यात आणली.

आगीत अनिल पाटील यांचे अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांचे मंडपाचे साहित्य जळून खाक झाले आहे.आग लागली नाही तर आग कोणीतरी लावली आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

परिसरात ग्रामस्थांची गर्दी झाली होती.मोहाडी पोलीसांना आगी बाबत माहिती देण्यात आली.त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली.उशीरा पर्यंत अग्नि उपद्रव 3 व 7 प्रमाणे उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.