पिंपळनेर जवळ भीषण अपघातात फायरमनचा जागीच मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील पिंपळनेर जवळ विचित्र अपघातात मुंबई येथून गावी काही दिवस सुट्टी मिळल्याने घरी आलेल्या फायरमनचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.

सविस्तर माहिती अशी की, पिंपळनेर जवळील पानखेडा जवळ भिषण आपघात एक व्यक्ती घटना स्थळी मयत झाला. व अन्य दोन गंभीर जखमी त्यात एकाची प्रकृती नाजुक असुन त्यांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने पिंपळनेर येथिल शासकीय ग्रामिण रुग्णालय येथे प्रथम उपचारासाठी दाखल केले. परंतु अन्य एकाची प्रकृती नाजुक असल्याने दोघे आयशर चालक व त्याचा सहयोगी यांना धुळे येथे तात्काळ हलविण्यात आले. ह्या अपघातात मयत मिथुन बाळु पवार हा गेल्या तीन ते चार वर्षा पुर्वी मुंबई येथील अग्नीशमन दलात दाखल झाला होता. व त्याची पोस्टींग मिरा भांईदर येथे नियुक्ती करण्यात आली होती.

मिथुन हा काल सायंकाळी सात वाजता आपल्या गावी हारपाडा येथे आला होता. व आज सकाळी स्कुटी या मोटर सायकलने हारपाडा येथुन पिंपळनेर येथे येत असतांना पिंपळनेर कडुन भरधाव वेगाने येणारा आयशर ट्रक ने स्कुटीला जोरदारपणे समोरासमोर धडक झाली. यात आयशर ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला व स्कुटी ही रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. आणि दुचाकीचा चुराडा झाला आहे. पिंपळनेर पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.