धुळे : बसमध्ये गांजा आढळल्यानं परिसरात प्रचंड खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये 7 किलो गांजा आढळून आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात आज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहर बस स्थानकात शहादा ते धुळे बस (क्रं. एम एच 11 / बी झेड) मुक्कामी थांबलेली होती. सकाळी परतीच्यावेळी चालक गाडी सुरु करण्यासाठी आला असता चालकाला  गाडीतून उग्र वास आला. त्याने तपासणी केल्यानंतर गांजा आढळून आला. याबाबत त्यांनी पोलीसांना माहिती दिला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी PSI श्रीकांत पाटील व  ASI हिरालाल बैरागी यांना तपासणीकरता पाठविले. तपासणीत 7.125 किलो गांजा मिळून आला. याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि श्रीकांत पाटील करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like