धुळ्यात एकाकडून गावठी कट्टा हस्तगत

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन

धुळ्यातील दोंडाईचा येथील डाबरी घरकुल योजनेच्या जवळ एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्याच्याकडे ४ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा सापडला आहे.

संजय अंबरसिंग पवार (३९, रा़ दोंडाईचा)असे त्याचे नाव असून ही कारवाई गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आली . याबाबत अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी पत्रकारांना माहिती दिली.  ही मोहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक एस़ बी़ भाबड, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलीस कर्मचारी नितीन मोहने, मायुस सोनवणे, मनोज पाटील, तुषार पारधी, सचिन गोमसाळे, चेतन कंखरे, विजय सोनवणे, पंडीत मोरे यांनी केली़ संशयित संजय पवार याला अटक करण्यात आली आहे.