धुळे : ‘सुसाट’ घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मनपाच्या सुसाट घंटागाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना ऐंशी फुटी रस्त्यावर आज दुपारी घडली. जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी चक्करबर्डी रुग्णालयात दाखल केले आहे.

आज (मंगळवार) दुपारी मनपाची घंटागाडी वरखेडी डेपोहून ऐंशी फुटी रस्त्याने कबीर गंज मार्गाने येत होती. तर खांडलविप्र भवनाकडुन येत दुचाकीस्वार रस्ता ओलांडत होता. त्यावेळी सुसाट घंटागाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. धेडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला. दुचाकी घंटागाडीच्या मागील चाकात अडकली होती. सुदैवाने जीवीतहाणी झाली नाही.

दरम्यान, या अगोदर देखील मनपाच्या कचरा संकलन करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार एक जखमी असा प्रकार घडला होता. घंटागाडीच्या वेगाला आवर घाला याबाबत वरखेडी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने केली आहे. तरीही यात सुधारणा होत नाही. मनपा आयुक्त याकडे कधी लक्ष देणार ? असा सवाल नागरिक करत आहेत.