धुळे : एलसीबीच्या पथकाकडून मोबाईल चोरट्याला अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – बारा पत्थर चौकातून मोबाईलवर बोलत पायी जाणाऱ्या नागरीकाचे हातातून मोबाईल चोरुन नेणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. आकाश हिरालाल मोरे (वय 19) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबरी मार्फत आकाशची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून चित्तोड रोड येथून आकाशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.