धुळे : जोयदा गावात लाखो रुपयांचा दारूसाठा जप्त ; एकाला अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्याची ओळखच दारु पिणारा जिल्हा अशी झाली आहे. जिल्ह्यात दारुचा पाऊसच पडतो. शासनाने दारुबंदीसाठी विविध प्रयत्न केले तरी मोठ्या प्रमाणात परराज्यातून जिल्ह्यात दारू आल्याने दारुबंदी करण्यात अद्यापही यश प्राप्त झाले नाही अशी नागरीकांत चर्चा आहे.

तालुक्यातील शिरपुर येथील जोयदा गावात ग्रामिण पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार एका व्यक्तीने अवैधरित्या राहते घरात देशी, विदेशी बनावट दारुचा लाखों रुपयांचा मद्य साठा लपवून ठेवला आहे. तो मद्यसाठा छापा टाकुन पोलीसांनी जप्त करत व्यक्तीला गजाआड केले.

सविस्तर माहिती की, शिरपुर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना खबरी मार्फत माहिती मिळाली की, हद्दीतील जोयदा गावातील एका घरात खोलीत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा व्यक्तीने लपवून ठेवला आहे. मिळालेल्या माहितीचे आधारे तालुका पोलीसांनी एक पथक तयार करुन पोलीस फौजफाट्यासह गावातील घरावर छापा टाकला व घरातील एका बंद खोलीत दडविलेला लाखों दारुसाठा सह सुरसिंग वाहऱ्या पावरा घर मालक याला राहते घरातून ताब्यात घेतले.

राहते घरातून
1) 46080/ रु किंमतीचा इम्पेरियल ब्लु कंपनीचे विदेशी दारुचे 288 नग बाटल्या.
2) 10560/रु किंमतीचे रॉयल स्टँग कंपनीचे विदेशी दारुचे 48 नग बाटल्या.
3) 52896/रु किंमतीचे टँगो पंच देशीदारुचे 912 नग बाटल्या.
असा एकुण 109,536 रु किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

सदर हि कारवाई निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर ग्रामिण पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व अधिकारी कर्मचारी यांनी केली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

 

Loading...
You might also like