महानगरपालिकेच्या वतीने खाजगी ठेकेदार मार्फत शहरातील मोकाट कुत्र्यांना बंदिस्त केले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील मोकाट कुत्र्यांना बंदिस्त करायची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली. याकरता कोईमत्तूर मधील 15 व्यक्ती धुळ्यात दाखल झाल्या. आज सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील विविध भागातील सात ठिकाणी या पथकातील लोकांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पिंजरा गाडीमध्ये शंभर कुत्री पकडण्यात आली. हि पकडलेली कुत्री शहरापासून शंभर किलोमीटर दूर अंतरावर ती सोडण्यात येणार आहे. अशी माहिती मनपा आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी दिली.

मोकाट कुत्र्यांपासून नागरिकांना होणारा त्रास वाचला असला तरीसुद्धा आज सायंकाळी काही नागरिकांनी पाळलेले मोकाट कुत्रे पथकाने घेऊन जाऊ नये याकरता त्याला घरात लपविण्याचा प्रयत्न काही नागरिकांनी केला. पिंजरा गाडीत कुत्र्याला पकडते वेळी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मोकाट कुत्र्यांचा त्रास कमी होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली. मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी का महानगरपालिकेचे खाजगी कंपनीला दिलेला आहे त्यात माध्यमातून आज ही कारवाई करण्यात आली.

महानगरपालिकेचे आयुक्त आजीज शेख सहाय्यक उपायुक्त गणेश गिरी आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे चंद्रकांत जाधव लक्ष्मण पाटील, राजेश वसावे, संदीप मोरे, साईनाथ वाघ, प्रमोद चव्हाण, महेंद्र ठाकरे, विकास साळवे, शुभम केदार, गजानन चौघटी यांनी हि मोहीम शहरात राबविली आहे. पुढे हि मोहीम सुरूच राहणार आहे. शहरात मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी केलेल्या कारवाईचे कौतुक नागरिकांनी केले आहे.