धुळे : मनपा आवारात संत गाडगे महाराज यांचा पुर्णा कृती पुतळा उभारावा या मागणीसाठी आंदोलन आणि घेराव

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मनपा आवारात संत गाडगे महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा त्वरीत उभारावा या मागणीसाठी धोबी (परिट) समाज मंडळ वतीने आंदोलन करण्यात आले.

सविस्तर माहिती की, महानगरपालिकेच्या नुतन इमारतीच्या प्रांगणात संत गाडगे महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी 2010 पासुन करण्यात आली. त्यानुसार 2011 साली महानगरपालिकेने ठराव करुन 15.50 लक्ष रुपयांचा ब्राॅंझ धातुचा पुतळा बनविण्याचे टेंडर ठेकेदार सरमत पाटील यांना देण्यात आले. त्यांनी तो पुतळा तयार केलेला आहे. संत गाडगे महाराजांचा पुतळा तयार झालेला असून 2015 रोजी महासभेत ठराव पारित करण्यात आलेला आहे. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. तत्कालीन आयुक्तांनी सर्व प्रकारच्या परवानगी मिळवण्यात आलेल्या आहे. महाराष्ट्र सरकारने पुतळा बसविण्यासाठी परवानगी (नाहरकत) देण्यात आलेली आहे. परवानगी मिळूनही एक वर्ष होऊन गेले तरी मनपा प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

माननीय मुख्यमंत्री ठाकरे हे संत गाडगे महाराज यांच्या दहा सुत्री कार्यक्रमा नुसार महाराष्ट्र सरकार चालवणार अशी घोषणा करतात. स्वच्छतेचे संदेश देणाऱ्या संतांचा पुतळा उभारणी बाबत मनपा प्रशासन गलीच्छ राजकारण करत आहे ही लाजीरवाणी बाब आहे. संत गाडगे महाराज यांच्या जयंती पर्यंत पुर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा या करीता धोबी समाज वतीने मनपा प्रवेश द्वारा समोर महिला, पुरष एकत्र येत ठिय्या आंदोलन करत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजन करत आयुक्तांच्या वाहनाला प्रवेश आंदोलनाच्यावेळी नाकारण्यात आला.

आयुक्त शेख व सहा.आयुक्त गणेश गिरी हे प्रतिमा पुजन साठी पुढे आले असता आंदोलन कार्यकर्त्यांनी दोघांना घेराव करत पुजन करतेवेळी तुम्हाला पुजनाचा अधिकार नाही. मागणीची पुर्तता करा जोरदार घोषणा बाजी केली आंदोलकांनी केली. जयंती पर्यंत पुर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी केली आणि लेखी निवेदन दिले. मागणी मान्य न झाल्यास बिऱ्हाड आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलन कर्त्यांनी यावेळी दिला. याला सर्वस्वी जवाबदार मनपा प्रशासन असेल असा इशारा दिला.

मनपा प्रवेश द्वारा पासुन आयुक्त व सहा. आयुक्त हे पायीच चालतच जात दालनात पोहचले. निवेदन देते वेळी नगरसेवक संजय वाल्हे, पंडित जगदाळे, अनिल काकुळदे, अनिता दाभाडे, सुनील खैरनार, संजय सपकाळ, शैलेश पवार, प्रविण चव्हाण, स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने आंदोलनकर्तेंनी जोरदार घोषणा देत मनपा परिसर दणाणुन सोडला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/