धुळे : पैशाच्या वादातून एकाला पेट्रोल टाकून जाळलं

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सोनगीर येथे पैशाच्या वादातून एका व्यक्तीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादयक घटना घडली आहे. नंदकिशोर आधार पाटील (वय 41, रा. सोनगिर) असे मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे सोनगीर गावात एकच खळबळ उडाली.

धुळ्यातील सोनगिर येथील नंदकिशोर पाटील आणि गावातीलच घनश्याम गुजर, मंगेश गुजर, आणि मख्खन गुजर यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद होता. नंदकिशोर पाटील यांच्याकडे आरोपींचे एक लाख रुपये होते. या वादातूनच त्यांचा खून करण्यात आला.

आरोपींनी नंदकिशोर पाटील यांना सोनगिर फाट्यावर बोलावले होते. तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. यात नंदकिशोर पाटील हे 90% जळाले. पहाटेच्या समुरास उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलीसांनी तीन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like