धुळे-नंदूरबार : भाजपचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांचा दणदणीत विजय

धुळे : धुळे -नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. पटेल यांनी ३३२ मते मिळाली असून महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांना ९८ मते मिळाली आहेत. ४ मते बाद झाली आहे.

अमरिश पटेल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र, कोरोनामुळे धुळे -नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणुक स्थगित केली होती. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबरोबर या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. या निवडणुकीत अमरिशभाई पटेल आणि काँग्रेसचे अभिजीत पाटील अशी सरळ लढत होती. धुळे पालिकेत काँग्रेस सत्तेवर आहे. त्यामुळे भाजपा व काँग्रेससाठी ही निवडणुक महत्वाची होती. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे त्यात बदल होणार का याविषयी उत्सुकता होती. मात्र, अमरिश पटेल यांनी आपल्या पद्धतीने सहज विजय साध्य केला.

You might also like