8 मागण्यांसाठी काळया फिती लावून राज्य सरकारी कर्मचारीची निदर्शने

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून निदर्शन. देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरू असतानाही व लॉक डाऊनच्या चौथा टप्प्यात सहा मागण्या मान्य व्हाव्यात याकरता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी दुपारच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात काळ्या फिती लावून राज्य शासनाचा निषेध करत प्रमुख मागण्या मान्य व्हाव्यात याकरता निदर्शने करण्यात आली.

देशातील प्रमुख राष्ट्रीय संघटनांनी देशव्यापी आंदोलनाची हाक आज दिली होती यात सहा प्रमुख मागण्या 1) कामगार कायद्यांना स्थगिती देण्यात येऊ नये.2) केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते कपात करू नये.3) कुरणाच्या नावाखाली केंद्र सरकारने राज्य सरकारने खासगीकरणाला गती देऊ नये.4) कर्मचाऱ्यांना आरोग्यसुविधा विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.5) सर्व विभागातील 55 वर्षावरील तसेच मधुमेह रक्तदाब आणि दुर्धर आजाराने ग्रस्त आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट मिळावी.6) कर्मचाऱ्यांना प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.7) रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्याबाबत सरकारने रोड मॅप तयार करावा आणि या भरतीमध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीला प्राधान्य द्यावे.8)आर्थिक सुधारणा करता विशेषता महसूल वाढीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्यवर्ती संघटनेला तातडीने चर्चेला पाचरण करावे. या मागण्यांसाठी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करून शासन धोरणांचा निषेध करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांना महिला आघाडीच्या वतीने किशोरी अहिरे 8 मागण्यांचे लेखी निवेदन दिले.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांच्या नेतृत्वात निदर्शने हे आंदोलन करण्यात आले.यावेळी सोबत अध्यक्ष अशोक चौधरी शेख मन्सूर राजेंद्र बागुल विश्वास काटकर रत्नाकर वसई कर सुधीर पोतदार कर्णिक यांनी सोशल डिस्टन्सिंग राखत, तोंडाला मास्क लावून हे निवेदन सादर केले. मागण्या मान्य नाही.तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल.याला जवाबदार शासन असेल असा इशाराही यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आला.