धुळे : बभळाज जवळ क्रुझर गाडी पुलावरून पडुन वृध्द महिला ठार व 9 जण जखमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शिरपूर तालुक्यातील शिरपूर चोपडा रस्त्यावरील बभळाज येथे         जामनेर येथून पानसेमल जाणाऱ्या क्रुझर गाडीच्या समोर रस्त्यावर दगड आल्याने
रस्त्याच्या घोलावर तोल गेल्याने पुलाच्या खाली क्रुझर पडली . यात गाडीचा
चालकसह एकुण 11 जण जखमी आहेत. यात वृध्द महिला धुळे जिल्हा रुग्णालयात
उपचारा दरम्यान दगवली तिची ओळख पटली असून तिचे नाव कलाबाई दयाराम राजपुत
वय.65.शेडगाव,तळेगाव ता.जामनेर जि.जळगाव येथील आहे. व गंभिर जखमी छगन
नकुल वावरे 65.यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

क्रुझर गाडीचा चक्काचुर झाला आहे.यात रुग्णांना ग्रामस्थांनी तातडीने मदत
करत शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील नऊ जखमी वर
धुळे येथील चक्करबर्डी जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/