धुळे : जावखेडात घराच्या छताचा स्लॅब पडल्याने ज्येष्ठाचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरपूर तालुक्यातील जावखेडा येथे घराच्या छताचा स्लॅब पडल्याने त्याखाली दबून ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिपरिप पाऊस पडत आहे. जावखेडा गावातील घराच्या (क्रमांक 67/बी) छतावर पाणी जमा झाले. स्लॅबमधून पाणी गळत होते. त्यामधून ही घटना घडली.

गुलाबराव लोटन पाटील (55)  असे या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वृध्दाचे नाव आहे. ही घटना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. पहाटे स्लॅब पडल्यानंतर त्याखाली दबलेल्या गुलाब पाटील यांना गावातील नागरिकांनी बाहेर काढून शिरपूर येथील कुटीर रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून पाटील यांना मृत घोषित केले. जावखेडाचे तलाठी डी.सी. निंबाळकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे.

Loading...
You might also like