मुंबई-आग्रा महामार्गावर कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई- आग्रा महामार्गावर कार आणि दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर कुंडाणे फाट्याजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास झाला. या अपघातातील व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील देवपूर भागातील कुंडाणे फाट्याजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला. यामध्ये टुरीस्ट कार (एमएच 04 जिडी 2245) मुंबईहून उत्तर प्रदेशात गेली होती. काल मध्यरात्री उत्तर प्रदेशातून परत मुंबईला जात असताना महामार्गावर धुळे कुंडाणे फाट्याकडे इनोव्हा कार जात होती. त्यावेळी अचानकपणे महामार्गावर रस्त्याच्या उजव्या बाजूने दुचाकस्वार (एमएच 18 बीफ 6950) अचानक समोर आला.

चाकीस्वार अचानक समोर आल्याने दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत दुचाकीस्वाराला चक्कर बर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. अपघाताबाबत देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like