मुंबई-आग्रा महामार्गावर उभ्या ट्रकवर आयशर आदळल्याने एक ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील रस्त्यावर अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री बाभळे फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला यात एक जण ठार झाला.

मुंबई-आग्रा महामार्ग वरती मध्यरात्री इंदूर नाशिक कडे जाणाऱ्या आयशर ट्रक हा मुंबई-आग्रा महामार्गावर डिझेल संपल्याने बाभळे फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेला ट्रक अंधारामुळे आयशर ट्रक चालकाला न दिसल्याने आयशर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून बाभळे फाट्याजवळ उभ्या ट्रकवर जोरदारपणे आदळल्याने यात गाडीतील एक जण गंभीर जखमी झाला आयशर ट्रक च्या समोरच्या भागाचाही चेंदामेंदा झाला.जखमीला नागरिकांच्या मदतीने 108 रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारार्थ चक्करबर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

मृतांची ओळख पटली असून त्याचं नाव संदिप राजाराम मुजालदे वय.25 क्लिनर राहणार आकाशवाणी टॉवर मध्य प्रदेश जिल्हा इंदोर येथील राहणार आहे.

या अपघाताच्या वेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती अपघाताची माहिती कळताच शिंगडा पोलिसांनी तातडीने भेट दिली व रंगलेली वाहतूक पूर्ववत केली दुपारी उशिरापर्यंत शिंगडा पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

You might also like