धुळे : DMIC साठी धरणे आंदोलन ; बैल पूजनासोबतच सरकारचा निषेध

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात नविन छोटे उद्योग सुरु होतील अशी आश्वासने हि राजकीय पक्षाकडुन देण्यात आली. उद्योग व्यवसाय सुरुच झाले नाही. बेरोजगारीचे प्रमाण वाढले. तरुण वर्ग हाताला काम नसल्याने व्यसन, अवैध व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आहारी जात आहे.

तरुणांना रोजगार मिळावा या करीता औरंगाबाद प्रमाणे जिल्ह्यात हि इंडस्ट्रियल कॉरीडॉर सुरु करु असे आश्वासन मिळाले परंतू ते फक्त आश्वासनच राहु नये या करीता शहरातील क्युमाईन क्लब समोर पोळा सणांचे औचित्य साधत आंदोलनाचे तिसऱ्या दिवशी सर्जा-राजा बैल जोडीचे पुजन करुन पोळा सण साजरा करत सरकारचा निषेध करण्यात आला. शासन वेळकाढु धोरण घेत आहे. हा प्रकल्प औरंगाबाद प्रमाणे धुळे जिल्ह्यात लवकर सुरू करावा. जिल्ह्याचा विकास होईल बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. त्याच प्रमाणे
दिल्ली – मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाचे कामकाज धुळे जिल्ह्यात लवकर सुरु झालेच पाहिजे याकरीता कोअर कमेटीचे समितीचे प्रमुख रणजित राजे भाेसले यांच्या नेतृत्वात तीन दिवसांपासुन धरणे आंदोलन सुरु आहे.

पोळा सणानिमित्त बैल जोडी पुजन करुन सरकारचा निषेध या वेळी करण्यात आला. मागणी आमची हक्काची आम्ही मिळवणारच अशा घोषणा देत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येने तरुण वर्गाचा व विविध राजकीय पक्ष, संघटनांचा पाठिंबा आंदोलनास मिळत आहे. या आंदोलनात कोअर समितीचे सदस्य रणजित राजे भोसले, कोअर किमिटीचे सदस्य शिवाजीराव पवार, महेंद्र शिरसाठ, संतोष सुर्यवंशी, रामचंद्र कोर, हरिष शेलार, कुणाल वाघ, अजय पाटील, चेतन पाटील, विशाल पाटील आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –