धुळे : 9 किलो गांजासह ठाण्यातील तिघांना अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – नरढाणा पोलीसांनी 9 किलो गांजासह ठाण्यातील तिघांना अटक केली आहे. मुंबई – आग्रा महामार्गावर वाहणाची तपासणी करत असताना ट्रॅव्हल्समध्ये ठाण्यातील तिघांच्या बॅगेत 9 किलो गांजा सापडला. प्रवीण सुनील रातांबे (वय 25, रा. दत्त नगर वसाहत, डोंबिवली पूर्व, ता. कल्याण, जिल्हा. ठाणे), सिद्धार्थ गोरख साबळे (वय 23, उल्हासनगर, ठाणे),
ज्योती लक्ष्मण गायकर (वय 23,  रा. दत्त नगर वसाहत, डोंबिवली पूर्व, ता.कल्याण, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खबरीमार्फत मिळालेल्या माहितीनूसार पोलीस मुंबई-आग्रा महामार्गावर नरढाणा येथील रेल्वे गेट उड्डाणपुलावर वाहणांची तपासणी करत होते. यावेळी ट्रॅव्हल्समध्ये तिघेजन गांजा घेऊन जात असल्याचे आढळले. पोलीसांनी तिघांसह ट्रॅव्हल्स ताब्यात घेतली आहे. हे तिघेही ठाण्यातील असून त्यांच्याविरूद्ध अवैधरित्या गांजा बाळगल्याप्रकरणी नरढाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे ट्रॅव्हल्समधून गांजीची वाहतूक करताना पोलीसांनी ट्रॅव्हल्स ताब्यात घेतली होती.