धुळे : तरुणाला बनावट पिस्टल व 4 जिवंत काडतूस, एक मोटरसायकलसह शिरपुर पोलीसांकडून अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – परराज्यातून जिल्ह्यात मोटरसायकलने बनावट पिस्तुल विक्रीसाठी येणाऱ्या युवकाला नाकाबंदी करुन तालुका शिरपुर पोलीसांनी गजाआड केले.

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात नाकाबंदी करुन वाहन तपासणीचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दिले आहे. अवैध रित्या दारु, शस्त्र व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शिरपुर तालुक्यातील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना खबरी मार्फत मिळालेल्या माहिती नुसार मध्यप्रदेशातील उमरटी गावातून मोटरसायकल क्रं. एम. पी. 46. एम. बी. 6693 हिचेने एक युवक बनावट पिस्टल जवळ बाळगून तिची चोरटी विक्री करण्यासाठी शिरपुरच्या दिशेने येत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार पोलीसांचे एक पथक तयार करुन वडेल गावाजवळ नाकाबंदी लावली असताना वडेल ठिकाणी आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्याकडे शिरपुरकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीसांनी मोटरसायकल क्रं.एम.पी.46 बी.6693 हिला थांबवून तरुणांची चौकशी व तपासणी केली असता, तरुणाने त्याचे कमरेला देशी बनावटी चे 20,000 रुपयांचे पिस्टल,व 800 रुपयांचे पिवळसर रंगाचे धातुचे 4 काडतुस, एक काळ्या रंगाची मोटरसायकल तरुणाकडुन शिरपुर पोलीसांनी जप्त केली आणि तरुणाला गजाआड केले.

संशयित तरुणांचे नाव सतनामसिंग महारसिंग जुनजा, वय.19. रा.उमरटी ता.बरेला, जिल्हा बडवानी, राज्य मध्यप्रदेश असे आहे. अवैध रित्या अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी शिरपुर ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like