महामार्गावर व्यापाऱ्याची लुट करणाऱ्याला अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात व्यापाऱ्यांकडुन रोकड लुटण्याचे प्रकरणात वाढ झाली होती. व्यापारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना व्यापारी लुटू करणारे आरोपींना पकडा असे लेखी निवेदन व्यापारी संघाने दिले होते. आझाद नगर पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावर मोटरसायकलवर जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून त्याचे जवळुन 35,000 हजारांची रोख रोकड लुटून चोरटे पसार झाले होते.

या बाबत व्यापारीने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्याचाच तपास करताना आझाद नगर पोलीसांनी महिना भरापासून वरखेडी, फागणे, वणी, बाळापुर, वडजई,सौंदाणे व उप नगर मोहाडी भागात संशयितांवर नजर ठेवून विजय भगवान पाटील (21) याला मोहाडी गावातून आझाद नगर पोलीसांनी सापळा रचून पकडले. परंतू त्याच्या सोबतीतील दोन साथिदार पोलीस पाहुन पसार झाले. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/